MIM सोबत एकत्र येण्याचा विचार नाही, Sharad Pawar यांनी इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव धुडकावला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एमआयएमचे (MIM) औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी दिलेल्या आघाडीचा प्रस्ताव धुडकावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एमआयएमचे (MIM) औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी दिलेल्या आघाडीचा प्रस्ताव धुडकावला आहे. शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर करत एमआयएमसोबतच्या आघाडीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एमआयएमनं महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपनं टीका करण्यास सुरुवात केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आज दुपारी एमआयएमला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार नसल्याचं सांगितलं होतं.
Latest Videos