अजित पवार गटाच्या भेटीनंतर मोठी अपडेट; भाजपसोबत जाणार का? शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका!
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
मुंबई, 17 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहू शकतो, यासाठी शरद पवार यांनी योग्य विचार करावा अशी विनंती केल्याचे ते म्हणाले. या चर्चेवेळी शरद पवार यांनी मौन बाळगले होते. या चर्चेनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. “आपल्याला पुरोगामी विचारासोबत राहायचे आहे. काही लोकांनी विनंती केली. पण, आपल्याला पुरोगामी विचार पुढे घेवून जायचे आहे असे शरद पवारांनी सांगितले,” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना “शरद पवार यांच्या भूमिकेत कुठलाही बदल नाही. भाजपसोबत जाण्यास त्यांचा विरोध आहे,” असं म्हटलं.