हा माणूस खल्लास केला की..., शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

हा माणूस खल्लास केला की…, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

| Updated on: Mar 21, 2024 | 6:19 PM

'शरद पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शरद पवार यांना संपवलं की राज्य आपल्या हातात, हीच भाजपची भावना आहे. भाजपकडे खूप पैसा आहे. त्या जोरावर ते काहीही करु शकतात.', शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप

पुणे, २१ मार्च २०२४ : भाजपला शरद पवार यांना मुळापासून संपवायचं आहे, असं म्हणत शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपवर गंभीर आरोप करताना सरोज पाटील म्हणाल्या, भाजपचा सगळा रोख सर्व शरद पवार यांच्यावर आहे. शरद पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शरद पवार यांना संपवलं की राज्य आपल्या हातात, हीच भाजपची भावना आहे. भाजपकडे खूप पैसा आहे. त्या जोरावर ते काहीही करु शकतात. अजित यांचा तोल थोडा सुटला असणार…पण त्यानेही दु:ख झाले असले. अजित चुकाला आहे की नाही, मला कळत नाही. परंतु शरद पवार यांच्याबाबतीत त्यांच्या तोंडातून जी भाषा आली, ते बोलण्याच्या ओघात आली असली त्यांच्या मनात तसे काहीच नसेल. त्याला लहानपणापासून मी ओळखते. तो संवेदनशील आहे. त्याला पश्चताप आणि दु:खही झाले असेल, अशी भावना अजित पवार यांच्या आत्या आणि शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केली.

Published on: Mar 21, 2024 06:19 PM