'हे म्हातारं काही थांबणार नाही...', शरद पवार यांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी

‘हे म्हातारं काही थांबणार नाही…’, शरद पवार यांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी

| Updated on: Oct 15, 2024 | 12:20 PM

फलटणचे आमदार दिपक चव्हाण आणि संजीव निंबाळकरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी रामराजे निंबाळकर यांनी देखील आपल्या सोबत असल्याचे संकेत जयंत पाटलांनी दिलेत आणि शरद पवारांनी वयाच्या मुद्द्यावरून अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा दिला.

इंदापूर, कागलनंतर आता फलटणमध्ये महायुतीला धक्का बसला आहे.  पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा शरद पवार यांनी महायुतीसह अजित पवारांचा एक आमदार आपल्याकडे नेलाय. रामराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेश केला नसला तरी त्यांचे बंधू आणि अजित पवार गटाचे सातारचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी महायुतीला रामराम करत हाती तुतारी घेतली. वय कितीही होऊद्या, हे म्हातारं काही थांबणार नाही, असं म्हणत वयावरून टीका करणाऱ्यांना शरद पवारांनी उत्तर दिलंय. दिपक चव्हाण हे फलटणचे आमदार आहेत. विद्यमान आमदारच शरद पवार यांच्याकडे गेल्याने ही जागा भाजपला सुटेल अशी चर्चा आहे. भाजपकडून सचिन कांबळे पाटील यांचं नाव चर्चेत आहे. रामराजे निंबाळकर यांनी महायुतीबद्दल नाराजी व्यक्त करत मेळावा घेतला होता. यावेळी समर्थक जे म्हणतील तो निर्णय घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आता त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला नसला तरी त्यांच्यासोबतच्या बहुतांश लोकांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. तर स्वतः रामराजे निंबाळकर यांनी स्वतः महायुतीचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 15, 2024 12:20 PM