वेदांता प्रकल्पावरून शरद पवारांचा मोदींना टोला

वेदांता प्रकल्पावरून शरद पवारांचा मोदींना टोला

| Updated on: Sep 15, 2022 | 4:13 PM

"केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे काही राज्यांसाठी अनुकूल असतात. त्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही," असं ते म्हणाले.

“केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे काही राज्यांसाठी अनुकूल असतात. त्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी साहेब स्वत: तिथे आहेत, अमित शाह तिथे आहेत. त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत आणि थोडं लक्ष जर त्यांनी गुजरातकडे दिलं तर आपण समजू शकतो. तुम्ही जर मोदी साहेबांचे दौरे काढले तर जास्तीत जास्त त्यांच्याच राज्यात ते जातात. साहजिकच आहे कुठल्याही माणसाला घरची ओढ जास्त असते,” असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेदांता प्रकल्पाबाबतची आपली भूमिका मांडली.