Special Report | लखीमपूरच्या घटनेवरून शरद पवार V/s देवेंद्र फडणवीस
फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली. मावळच्या शेतकऱ्यांचा नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती. पण नंतर यात सत्ताधाऱ्यांचा संबंध नसल्याचं मावळच्या लोकांच्या लक्षात आलं. तर परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रोत्साहित केलं.
मुंबई : मावळमधील गोळीबाराच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलं. मावळमध्ये काय घडलं हे त्यांनी सांगितलं हे बरं झालं. त्यावेळी कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. मावळमध्ये जे झालं. शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्याला राजकीय पक्षाचे सत्ताधारी जबाबदार नव्हते. नेतेही जबाबदार नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हे प्रकर घडलं. फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली. मावळच्या शेतकऱ्यांचा नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती. पण नंतर यात सत्ताधाऱ्यांचा संबंध नसल्याचं मावळच्या लोकांच्या लक्षात आलं. तर परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रोत्साहित केलं. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असं मावळच्या लोकांना आज वाटतंय. मावळची वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याच मावळमध्ये भडकवण्याचं काम कोणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके 90 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या वर्षांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती. माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण काढलं हे बरं झालं. त्यांनी मावळची मानसिकता जाणून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा चिमटाही त्यांनी काढला.