Sharad Pawar | चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शरद पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया

| Updated on: Dec 27, 2021 | 4:56 PM

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सर्वच कारभार केंद्राकडे द्या, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानाचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. असं विधान करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा शरद पवार यांनी चंद्रकांतदादांना काढला आहे.

साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना पवारांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. राष्ट्रपती लागवट लागू करण्याबाबत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं पवार म्हणाले.

Published on: Dec 27, 2021 04:56 PM