VIDEO : राष्ट्रवादी कधीही विसर्जित होईल, दिलीप वळसे पाटील सावध राहा : गोपीचंद पडळकर

VIDEO : राष्ट्रवादी कधीही विसर्जित होईल, दिलीप वळसे पाटील सावध राहा : गोपीचंद पडळकर

| Updated on: Sep 08, 2021 | 9:02 AM

राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही, हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, असा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ते जुन्नरमधील बेल्हे इथल्या भाजपाच्या मेळाव्यास संबोधन करत होते.

पुणे : आम्ही लोकशाही पद्धतीने चालणारे आहोत असे राष्ट्रवादी पक्ष वारवांर सांगत असतो. मात्र पक्षात खरंच लोकशाही आहे का ? हाच प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही, हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, असा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. ते जुन्नरमधील बेल्हे इथल्या भाजपाच्या मेळाव्यास संबोधन करत होते.
राष्ट्रवादी हा पक्ष जादा दिवस टिकणारा पक्ष नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली अन्यथा मोडून खाल्ली अशी दयनीय अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. राष्ट्रवादीची व्याख्या आता वेगळीच आहे. हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो, असा घणाघातही गोपीचंद पडळकर यांनी केला.

वळसे पाटील सावध राहा

महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शरद पवारांनी पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत गृहमंत्रालय पाहिजे असतं. मग पवारांनी अनिल देशमुखांना शोधलं, त्यांचं कधी नाव ऐकलं होतं का? असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला होता.  शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.