महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न दिसतोय- शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar)हे नास्तिक आहेत. ते कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फक्त फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केली होती.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar)हे नास्तिक आहेत. ते कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ते फक्त फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतात, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केली होती. राज यांच्या या आरोपाचं खंडन करतानाच शरद पवार यांनी त्यांना आरसा दाखवला. आपण नास्तिक आहे की नाही हे सांगताना माझ्या धर्माचं मी प्रदर्शन करत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) माझे आदर्श आहेत. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. गैरफायदा घेणाऱ्या घटकाला ठोकून काढण्याचां काम प्रबोधनकारांनी केलं, असं त्यांनी सांगितलं.
Published on: Apr 13, 2022 02:26 PM
Latest Videos