उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ जखमेवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलांकडून घाव; म्हणाल्या, त्याच्याच हातून पक्ष…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जखमेवरच घाव घातलाय. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं त्यांच्या हातून पक्ष गेलाय, असं शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य करत त्यांना खोचक टोला लगावलाय.
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधताना दिसताय. आता तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जखमेवरच घाव घातलाय. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं त्यांच्या हातून पक्ष गेलाय, असं शर्मिला ठाकरे यांनी वक्तव्य करत त्यांना खोचक टोला लगावलाय. या टीकेवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं त्यांच्या हातून शिवसेना गेली असं त्या म्हणाल्या, या दिग्गजांमध्ये स्वतः राज ठाकरे हे देखील आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अदानींविरोधात धारावीत काढलेला मोर्चा असो किंवा मराठ आरक्षण या मुद्द्यावरून शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आमने-सामने आल्याचे कित्येकदा पाहायला मिळालं मात्र आता थेट शर्मिला ठाकरे मैदानात उतरल्यात….