तर रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करू, पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शशी थरूर काय म्हणाले?
शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या विधानावर शशी थरूर यांनी हे वक्तव्य केले आहे. भविष्यात काहीही होऊ शकतं. कोणत्याही कारणावरून जे काँग्रेस सोडून गेले होते. पण त्यांना परत यायचं असेल तर आम्ही त्यांचं परत स्वागतच करू, असं शशी थरूर म्हणाले.
शरद पवार परत येणार असतील तर रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करू, असं वक्तव्य शशी थरूर यांनी केले आहे. शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या विधानावर शशी थरूर यांनी हे वक्तव्य केले आहे. भविष्यात काहीही होऊ शकतं. कोणत्याही कारणावरून जे काँग्रेस सोडून गेले होते. पण त्यांना परत यायचं असेल तर आम्ही त्यांचं परत स्वागतच करू, असं शशी थरूर म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, असा कोणता एकच पक्ष नाही. देशात अनेक पक्ष आहेत. जे काँग्रेस पक्षात होते. पण कोणत्या न् कोणत्या कारणावरून ते पक्षातून बाहेर पडले पण आता आम्ही त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू. कारण विचारधारा एक असेल कर वेगळं राहण्याची गरज नाही, असेही शशी थरूर यांनी म्हटले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून दिले होते.