Shashikant Shinde | माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार, शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप

Shashikant Shinde | माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार, शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 25, 2021 | 3:24 PM

मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाली यामुळे या कटाचा सुत्रधार कोण हे ओळखावं, असं शशिकांत म्हणाले. माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) जबाबदार असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यानी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत (Satara District  Bank Election) झालेल्या पराभवावर भाष्य केलं. जिल्हा बँकेच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. ते माझ्यावर झालेले नाहीत. निवडणुकीत गाफीलपणा नडल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. परंतु, चर्चा सुरु झाल्या होत्या त्यावेळी काही जणांनी हस्तक्षेप वाढल्याचं म्हटलं त्यावर सविस्तर बोलणार आहे. सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली. सहकार पॅनेलचे इतर उमेदवारही पडले, त्यासंदर्भात पॅनेल प्रमुखांनी खुलासा करायला हवा होता. मात्र, त्यांनी न केल्यानं मला भूमिका घ्यावी लागत आहे. मी पराभूत झाल्यावर काहीजण नृत्यात सहभागी झाली यामुळे या कटाचा सुत्रधार कोण हे ओळखावं, असं शशिकांत म्हणाले. माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) जबाबदार असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे.