सातारा, जावळीच्या राजकारणात यापुढे लक्ष घालणार, शिवेंद्रराजे यांना शशिकांत शिंदेंचा इशारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. शिंदे समर्थकांना पक्ष कार्यालयावर दगडफेक करत राग व्यक्त केला असून त्यामुळे परिसरातील वातावरण तापलेलं आहे.

या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ज्यांना मी वाढवलं त्यांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. मी आजपर्यंत पक्षाच्या चौकटीत बंधनात होतो. मी आता मोकळा झालो आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस जावळी तालुक्यात साताऱ्यात वाढवण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करेन. त्यांनी त्यांची ताकद लावावी, मी माझी ताकद लावतो, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.