मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरे यांनी दिलेलं चॅलेंज शिंदे गटाच्या 'या' रणरागिणीनं स्वीकारलं; म्हणाल्या...

मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरे यांनी दिलेलं चॅलेंज शिंदे गटाच्या ‘या’ रणरागिणीनं स्वीकारलं; म्हणाल्या…

| Updated on: Feb 04, 2023 | 1:33 PM

'तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर...' काय दिलं शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर

मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा. तुम्ही कसे निवडून येता हे पाहतो. असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिेलेले हे आव्हान शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी स्वीकारलं आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला धमकी देण्याचीच इच्छा असेल, तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक वरळीतून लढायला तयार आहेत. त्यासाठी शिंदे साहेबांना वरळीच्या मैदानात उतरण्याची गरज नाहीये, असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून शीतल म्हात्रे यांना कोणतं उत्तर दिले जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 04, 2023 01:33 PM