Bangladesh Crisis : शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात काय होणार? रोडमॅप तयार

Bangladesh Crisis : शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात काय होणार? रोडमॅप तयार

| Updated on: Aug 06, 2024 | 5:58 PM

शेख हसिना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका शहर सोडलं आणि ते भारतात दाखल झाले. या संपूर्ण घटनेने बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या प्रकारानंतर बांगलादेशात नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित होतोय. बघा कसा असणार बांगलादेशाचा रोडमॅप...?

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी काल राजीनामा दिल्यानंतर देशात अनेक घडामोडी घडण्यास सुरूवात झाली. शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन त्या देशाबाहेर पळाल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन शेख हसीना यांचा राजीनामा स्वीकारला आणि देशात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. यानंतर बांगलादेशात नेमकं काय होणार? बांगलादेशमधील परिस्थिती कशी आहे? याचा रोडमॅप तयार झाला आहे. राजकीय कैद्यांची सुटका, सर्व खटले संपले आणि ३ महिन्यात निवडणुका होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानपदासाठी अद्याप कोणतंही नाव निश्चित झालेलं नाही. बांगलादेश नॅशलिस्ट पार्टीच्या प्रतिनिधींची मंगळवारी अध्यक्ष शहाबुद्दीन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. दरम्यान, अंतरिम सरकारच्या कार्यकाळ ३ महिन्यांचा असणार आहे. या कालावधीत बांगलादेशातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. बघा आणखी कसा आहे रोडमॅप…?

Published on: Aug 06, 2024 05:58 PM