सर्वपक्षीय बैठकीतून मी निराशेने बाहेर पडलो…., जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात एकमत झाले. मात्र या बैठकीवर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात एकमत झाले. तर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. त्रुटी काढून आम्ही आरक्षण देऊ, असे म्हणत सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र या बैठकीवर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी निराश झालो. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात जो ठाम निर्णय घ्यायला हवा होता तो झाला नाही. मनोज जरांगे यांचा जीव वाचला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला. यानंतर राज्य सरकारकडून कोणता तरी निर्णय होईल. पण त्याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे मी निराश होऊन या सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडलो.’, अशी थेट प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
Published on: Nov 01, 2023 09:05 PM
Latest Videos