‘शेर’ अकेले घुमते है, ‘झुंड’मे घुमनेवाले टीम… नवनीत राणा यांचा विरोधकांवर प्रहार
आज विरोध करताय. मात्र, उद्या जनतेच्या हिताचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी तुम्ही त्या पायऱ्या चढणार नाही का? गुजरातमध्ये महिला मुख्यमंत्री केली. पण, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री म्हणून वंचित का आहे? इतका मान सन्मान आहे तर राज्यात का संधी दिली नाही?
अमरावती : नवी दिल्ली येथे नवीन संसदेच्या इमारतीच्या उदघाटनाला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. हा विरोध म्हणजे 130 कोटी जनतेच्या विश्वासाला विरोध आहे. पहिले त्यांनी कामाला विरोध केला. मग, कामाच्या शैलीला विरोध केला. आता पार्लमेंटलाचा विरोध करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हाच नव्या संसद भवनाची घोषणा केली होती. पण, विरोधकांची पोटदुखी यासाठी आहे की ते जे विचार करू शकले नाहीत ते मोदीजींनी करून दाखवलं. मोदीजी है तो मुमकिन है. शेर अकेले घुमते है आणि झुंड मे घुमने वाले अपनी टीम बना रहे है अशा टोला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लगावला. आज तुम्ही विरोध करताय. मात्र, उद्या जनतेच्या हिताचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी तुम्ही त्याच्या पायऱ्या चढणार नाही का? असा थेट सवालही त्यांनी केला. आदिवासी क्षेत्राला बीलॉंग करणारी महिला म्हणून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवण्याचे काम मोदीजींनी केलं. गुजरातमध्ये महिला मुख्यमंत्री केली. पण, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री म्हणून वंचित का आहे? इतका मान सन्मान आहे तर राज्यात का संधी दिली नाही? असे सवाल त्यांनी केले.