MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 20 July 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 20 July 2021

| Updated on: Jul 20, 2021 | 1:22 PM

राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आणखीही अनेकांची नावे समोर येत असून पोलिस तपास करत आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या आणखीही साथीदारांना अटक करण्यात येत आहे. यान्वयेच नेरुळ आणि रायगडमधूनही दोघांना अटक केली आहे. त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली.