Maratha Reservation : शिंदे समितीने सादर केलेल्या पहिल्या अहवालात किती कुणबी नोंदी मिळाल्या?
CM Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असताना मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली. शिंदे समितीने सादर केलेल्या पहिल्या अहवालात ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या तर १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मागणीला काही अंशी यश आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी घेण्यात आलेल्या उपसमितीच्या बैठकीत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समितीने आज पहिला अहवाल सादर केला. शिंदे समितीने सादर केलेल्या पहिल्या अहवालात ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या तर १ कोटी ७२ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पुढची कार्यवाही सुरू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय
Published on: Oct 30, 2023 01:46 PM
Latest Videos