‘टाटा म्हणजे विश्वास, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचं काय?’ सामनातून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाना
ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावेळी ही टीका ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आलेल्या उद्योगरत्न पुरस्कारावरून करण्यात आली आहे.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार काल देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावरूनच आजच्या सामनात खरमरीत टीका करण्यात आली आहे. रतन टाटांना म्हणजे टाटा जे विश्वासाचे मात्र पुरस्कार देणाऱ्यांचे काय ? त्यांचे हात चोऱ्या – लुटमारीत गुंतली आहेत. त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली अशी घाणाघाती टीका आज सामनातून करण्यात आली आहे. तर अजित पवार, शिंदे, केसरकर, उद्योगमंत्री सामंत यांनी ‘विश्वास’ शब्दाची विल्हेवाट लावली. तेच आज टाटांच्या निमित्ताने ‘ट्रस्ट’, ‘विश्वास’ असे शब्द म्हणत आहेत. तर ज्या हातांनी हा पुरस्कार दिला त्यांची योग्यता खरोखरच आहे काय? असा सवाल देखील यावेळी करण्यात आला आहे.