VIDEO : शिंदे मंत्री मंडळातील मंत्र्यांना डच्चू? भाजपचा ‘हा’ नेता म्हणाला, ‘भाजप कधीच…’
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, भारतीय जनता पक्षाचा मी 32 वर्षापासून कार्यकर्ता आहे.
आळंदी : शिंदे-फडणवीस सरकारमधील चार मंत्र्यांना आता बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा दबाव असल्याचं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, भारतीय जनता पक्षाचा मी 32 वर्षापासून कार्यकर्ता आहे. त्यामुळं भाजप कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही. तर कोणाला मंत्री करायचं कुणाला नाही ठेवायचं हा अधिकार शिंदे यांचा आहे. त्यांच्या पक्षात कोणाला काढायचं हा त्यांचा अधिकार आहे. यात भाजप कधीच नाक खुपसत नाही. त्यामुळे कशाला त्यांना सल्ला द्यायचा? आमचं युतीचे सरकार आहे. भाजपचा कोण मंत्री व्हावं कोण नाही हे भाजप ठरवेल. शिंदे त्यांच ठरवतील. तर शिंदे गटाच्या आमदारांत धास्ती वाढली पाहिजे, आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी याकरिता हे कोणीतरी गाजराचे पुंगी सोडत आहे.