मराठा आरक्षणाबाबत सरकार अपयशी, टीका करत कुणी व्यक्त केली नाराजी?

मराठा आरक्षणाबाबत सरकार अपयशी, टीका करत कुणी व्यक्त केली नाराजी?

| Updated on: Apr 22, 2023 | 10:00 AM

VIDEO | मराठा समाजाने आयुष्यभर संघर्ष करायचा का? सरकारला धारेवर धरत कुणी उपस्थित केला सवाल?

जळगाव: राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर येत बैठकही घेतली. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाज हा वर्षानुवर्ष मोठ्या आशेवर होता की, कोर्टाकडून तरी न्याय मिळेल तर या आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडे हे सरकार आपली भूमिका मांडण्यात एक प्रकारे अपयशी ठरलं. अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. मराठा समाजाने काय आयुष्यभर संघर्ष करत राहावं का? या सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करावा, यामध्ये कोणतीही कायदेशीर लढाई लढण्यासारखी असेल तर ती जरूर लढावी, अशी विनंतीही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली आहे.