Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, कोणाच्या नेतृत्वात तपास होणार?

Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, कोणाच्या नेतृत्वात तपास होणार?

| Updated on: Dec 12, 2023 | 4:55 PM

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर मुंबई पोलिसांकडून दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह आता ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होणार?

नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर मुंबई पोलिसांकडून दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह आता ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या एसआयटीमध्ये कोणा-कोणाचा सहभाग असणार त्या सदस्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात आता दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. तर पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल या प्रकरणाचा तपास करतीस. यासह मालवणी पोलीस ठाण्याचे सीनिअर पीआय चिमाजी आढाव तपास करतील. त्यामुळे एसआयटीचं काम आता लवकरच सुरू होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांचं नाव सातत्याने घेतलं जात होतं. त्यामुळे आता या प्रकरणी कोणती अधिक माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Dec 12, 2023 04:55 PM