मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलंय का? म्हणत फडणवीस यांच्यावरही राऊत बरसले; म्हणाले, त्यांना मन…
पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी याच फडणवीस यांच्या भाजप पक्षाने राज्यात आणि देशात राजकारण केलं होतं. पण आता खारघर येथील यांच्याच कार्यक्रमात 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही
मुंबई : खारपाणपट्ट्यातील पाणीपुरवठा योजना शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली. त्यानंतर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी अकोला ते नागपूर पायी ‘संघर्ष यात्रा’ काढली मात्र त्यावेळी त्यांना अटक केली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. याचवेळी राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. राऊत यांनी खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार का तयार नाहीत. तर या घटनेवर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे का असा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी याच फडणवीस यांच्या भाजप पक्षाने राज्यात आणि देशात राजकारण केलं होतं. पण आता खारघर येथील यांच्याच कार्यक्रमात 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील या घटनेवर गप्प बसले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांची माणुसकी मेली आहे का? त्यांच्यात मन नाही का अशी टीका केली आहे.