शिंदे सरकारचं डेथ वॉरट तयार, १५-२० दिवसात कोसळणार; कुणी केला मोठा दावा?
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत कुणी केलं भाकीत, बघा व्हिडीओ
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे विराजमान झालेत गेले कित्येक महिने उलटून गेल्यानंतर आजही विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत भाकित केलं आहे. संजय राऊत म्हणाले, शिंदे सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे असून सध्याचे जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे ४० आमदार आहेत त्यांचं जे राज्य सुरूये ते येत्या १५ ते २० दिवसांत कोसळणार आहे, असा दावाही केला आहे. तर या सरकारचं डेथ वॉरंट निघाले असून आता केवळ सही कोणी आणि कधी करायची हेच बाकी आहे, त्यामुळे पुष्पचक्र अर्पण करा, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
Published on: Apr 23, 2023 12:47 PM
Latest Videos