Shambhuraj Desai : शिंदे सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटायला जाणार? मंत्री शंभूराज देसाई स्पष्टच म्हणाले…
VIDEO | गेल्या पाच दिवसांपासून सरकारकडून चर्चेला कोणी आले नसल्याने जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला कोणीच का गेले नाही? असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांना केला असताना त्यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिले आहे.
पुणे, २९ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून सरकारकडून चर्चेला कोणी आले नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला कोणीच का गेले नाही? असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांना केला असताना त्यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिले आहे. ते म्हणाले राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली तरीही त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं. त्यानंतर ते म्हणाले, कुणीही राजकीय नेत्यांनी आमच्या गावात येऊ नका. असे असतानाही आम्ही गेलो आणि समाजाच्या भावना प्रक्षुब्ध होणार असतील त्यामुळे आम्ही जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंना भेटण्यासाठी गेलो नाही, जर आता मनोज जरांगे म्हणत असतील तर सरकार नक्कीच चर्चेला तयार आहे. आम्ही एक नाही तर 100 वेळा जाऊन त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची तयारी आहे, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.