जरांगे पाटील सरकारला वेळ वाढून देणार का? म्हणाले, चर्चा २४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार पण…
सरकारने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण पुन्हा आंदोलनाला सुरुवात करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला असताना त्यापूर्वी आज सरकारच्या शिष्टमंडळात आणि जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा झाली. काय केली शिष्टमंडळाने जरांगेंकडे मागणी
जालना, २१ डिसेंबर २०२३ : सरकारने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण पुन्हा आंदोलनाला सुरुवात करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला असताना त्यापूर्वी आज सरकारच्या शिष्टमंडळात आणि जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे यांना सरकारला दिलेली 24 डिसेंबरपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. यावर जरांगे म्हणाले, ज्या-ज्या वेळी सरकारने जे काही सांगितलं त्यावेळी मराठा समाजाने सरकारच्या शब्दांचा सन्मान केलाय. यापूर्वी सरकारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीनदा वेळ तीन महिन्याचा, ४० दिवसांचा आणि आता २ महिन्यांचा वेळ दिला असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. समाज म्हणून सरकारचा शब्द पाळायला मराठा समाज कमी पडला नाही. आता त्यांनी ठरवलेले शब्द आहेत ते त्यांनी घ्यावेत अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे व्यक्त केली.