जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटमला काहीच तास शिल्लक, ‘सगेसोयरे’वर अडलं अन् चर्चा फिस्कटली
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काहीच दिवस उरले आहेत. त्याआधीच सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यावेळी वेळ वाढवून मागितली. मात्र सगेसोयरे या शब्दावरून चर्चा फिस्कटली
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काहीच दिवस उरले आहेत. त्याआधीच सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि यावेळी वेळ वाढवून मागितली. मात्र सगेसोयरे या शब्दावरून चर्चा फिस्कटली. कुणबी नोंदीवरून सगे सोयरे यांनाही जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली. त्यासाठी सरकारने लिहून दिलेला कागद जरांगेंनी शिष्टमंडळासमोर काढलाय. पण सगसोयरे यांना कुणबी दाखला देणं शक्य नाही. पत्नीच्या दाखल्यावरून मुलांना जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही. अशा स्पष्ट शब्दात गिरीश महाजन यांनी जरांगेंची मागणी धुडकावली. तर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा अधिवेशनात केली. तर यावेळी नवा कायदा तयार करून मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचेही सांगितले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट