शिव्या दिल्याशिवाय दिवसाची सुरूवातच नाही, शिंदेंच्या मंत्र्याचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

शिव्या दिल्याशिवाय दिवसाची सुरूवातच नाही, शिंदेंच्या मंत्र्याचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Dec 10, 2023 | 12:51 PM

संजय राऊत यांनी सर्वात आधी एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावं, कुठल्या पुण्य कर्मासाठी 110 दिवस जेलमध्ये होतात? असा सवाल करत या प्रश्नाचे पहिले उत्तर द्या, मग शिंदे सरकारवर टीका करा, असा हल्लाबोलच शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर केला

ठाणे, १० डिसेंबर २०२३ : संजय राऊत हे कधीही चांगले बोलू शकत नाही. सकाळी दहा वाजता राऊत बोलतात म्हणजे सकाळी कुणाला न् कुणाला तरी शिव्या शाप दिल्याशिवाय राऊतांचा दिवस जात नाही, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तर संजय राऊत यांनी सर्वात आधी एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावं, कुठल्या पुण्य कर्मासाठी 110 दिवस जेलमध्ये होतात? असा सवाल करत या प्रश्नाचे पहिले उत्तर द्या, मग शिंदे सरकारवर टीका करा, असा हल्लाबोलच शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, संजय राऊत तुम्ही अजून जामिनावर आहात त्यामुळे अजून निर्दोष झाले नाहीत. त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अजून त्या प्रकरणात निष्कर्ष आले नाहीत तर केवळ जामिनावर सुटका करण्यात आली आहे, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी खोचक टीकाही संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Published on: Dec 10, 2023 12:50 PM