हे सरकार पडणारच! सत्तासंघर्षाच्या निकालाआधी नरहरी झिरवळ यांचा सर्वात मोठा दावा
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच नरहरी झिरवळ यांनी मोठा दावा केला आहे.
मुंबई : गुरुवारी सुप्रीम कोर्ट ( Supreme Court ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणार आहे. कारण या निकालानंतर राजकारणाची दिशा बदलू शकते. महाराष्ट्रातील राजकारणाला ( Maharashtra Politics ) एक वेगळं वळण लागू शकतं. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र घोषित ( 16 Mla Disqualification Case) करण्याची मागणी ठाकरे गटाने ( Thackeray Group ) कोर्टात केली आहे. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय य़ेण्याआधी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( Narhari Zirval ) यांनी टीव्ही ९ मराठीवर प्रतिक्रिया दिली आहे. मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. असं त्यांनी म्हटले आहे.
‘प्रक्रिया सुरू होताना नार्वेकर साहेब सभागृहात नव्हते. मी निर्णय दिला त्यावेळी नार्वेकर साहेब नव्हते. अजूनही मी त्या जागेवर आहे. त्यामुळे निर्णय माझ्याकडेच येणार. जो निर्णय दिलाय, तो मी दिलाय. त्यामुळे माझ्याकडेच निर्णय येईल. अविश्वास दाखल झाल्यावर मान्य व्हावा लागतो. ना माझ्यावरचा अविश्वास मान्य झाला, ना अध्यक्षावरचा. ‘
‘सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्यावर कुणीच नाही. त्यांना अपात्र केलंय, म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले. हा महाराष्ट्रापुरता निर्णय नाही, सर्व देशावर याचा परिणाम होईल. हे सरकार पडणारच.’ असं अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.
Published on: May 10, 2023 09:24 PM
Latest Videos