ते मंत्रालयात किती वेळा आले? CCTV तपासा, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात
शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. मंत्रालयात न येणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला बदनाम करू नये असा घणाघात उद्धव ठाकरेंवर करण्यात आला आहे.
मुंबई : दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. मंत्रालयात न येणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला बदनाम करू नये असं दिपक केसरकरांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात किती वेळा आले? याचे सीसीटीव्ही फुटेज तपासा असंही यावेळी केसरकर म्हणाले आहेत. दरम्यान त्यांनी यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंकडून भरकटवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे लोकांनी सावध रहावं असा टोला केसरकर यांनी लगावला आहे. दिपक केसरकरांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला होता.