शिंदे गटाकडून ठाकरे गटाची कोंडी? शिवसेनेची कार्यालये तब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू

शिंदे गटाकडून ठाकरे गटाची कोंडी? शिवसेनेची कार्यालये तब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू

| Updated on: Feb 18, 2023 | 3:04 PM

VIDEO | विधानभवन, मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गट हक्क सांगणार, बघा काय सुरू आहेत शिंदे गटाकडून हालचाली?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या निलंबनाचं प्रकरण प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. अशातच आता शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विधानभवन, पालिकेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गट हक्क सांगणार आहे. शिंदे गटाकडून विधानभवन, मुंबई पालिकेतील पक्ष कार्यालयावर दावा करण्यात आल्याने शिंदे गटाकडून ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज राज्यभरात अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे समर्थक शिवसैनिक रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करतांना दिसत आहेत.

Published on: Feb 18, 2023 03:04 PM