‘मला अमरावतीत भाजपनं उमेदवारी दिल्यास…’, शिंदे गटाच्या अभिजीत अडसूळ यांचं मोठं वक्तव्य
मला अमरावतीतून उमेदवारी दिल्यास बच्चू कडू उमेदवार देणार नाहीत, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर भाजपकडून निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मला अमरावतीतून उमेदवारी दिल्यास बच्चू कडू उमेदवार देणार नाहीत, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर भाजपकडून निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, भाजप आणि एकनाथ शिंदे गट लोकसभेत ४०० पारच्या आकड्याचा विचार करतोय पण जर अमरावतीमध्ये चुकीचं तिकीट वाटप झालं तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यात कमी पडू…दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट घेतली त्यावेळी अमरावतीतील काही नेते देखील तेथे हजर होते त्यांनी देखील त्यांच्या भावना माझ्यापेक्षा जास्त तीव्रपणे व्यक्त केल्यात. नवनीत राणा यांना कोणत्याही प्रकारे भाजपने तिकीट देऊ नये, असे त्यांनी मत व्यक्त केले. तर बावनकुळे यांनी भावना शांतपणे ऐकल्या आणि ते सकारात्मक वाटल्याचेही अडसूळ यांनी म्हटले.