मंत्री सत्तार यांच्या घरी शहनाई, धाकट्या मुलाचं लग्न, पण चर्चा मात्र अपुऱ्या पोलीसबळाची

मंत्री सत्तार यांच्या घरी शहनाई, धाकट्या मुलाचं लग्न, पण चर्चा मात्र अपुऱ्या पोलीसबळाची

| Updated on: Nov 20, 2023 | 11:32 AM

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा, १ उपायुक्त, १ सहआयुक्त, ४ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक तर १५० पोलीस तैनात. बड्या नेत्याच्या मुलाचा विवाह सोहळा असल्याने पोलीस बंदोबस्त आवश्यक... मात्र संभाजीनगरात अपुऱ्या पोलीसबळाचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : छत्रपती संभाजीनगरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या लहान मुलाचा विवाह सोहळा नुकताच रंगला. अनेक नेते शहरात असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील अपुऱ्या पोलिसांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा नुकताच झाला. अनेक बड्या नेत्यांनी या विवाह सोहळ्यात उपस्थिती दर्शविली. या लग्नानिमित्त तब्बल २५ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. बंदोबस्त म्हणून सत्तारांच्या घरी असलेला लग्न सोहळा म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. १ उपायुक्त, १ सहआयुक्त, ४ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक तर १५० पोलीस तैनात करण्यात आले होते. बड्या नेत्याच्या मुलाचा विवाह सोहळा असल्याने पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे. मात्र यानिमित्ताने संभाजीनगरात अपुऱ्या पोलीसबळाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 20, 2023 11:32 AM