एकनाथ शिंदे आणि अजितदादांमधील वादावर गुलाबराव पाटील म्हणाले, … तर मी पुढच्या बैठकीत बघेन
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये फाईल्सवर केल्या जाणाऱ्या स्वाक्षरीवरून वाद-विवाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं असून विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ही अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.
महायुती सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या वादावर एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काय झालं माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याच्या विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी त्या कॅबिनेटच्या बैठकीला नव्हतो… त्यावेळी मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मी जळगावात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद झाला असेल तर मी पुढच्या कॅबिनेटच्या बैठकीला बघेन’, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.