‘मी कर्ज काढून बंदुका घेऊन देणार’, शिंदे गटाच्या नेत्याचं महिलांसाठी अनोखं फर्मान? वादग्रस्त वक्तव्य काय?
महिलांना पिस्तुल बाळगण्याची परवानगी द्या, त्यात दोन-चार चांगले मेले तरी हरकत नाही, मी पिस्तुल वाटपापासून ते कोर्ट कचेरीचा सारा खर्च करेल, असं वक्तव्य अमरावतीतील शिंदे गटाच्या एका नेत्यानं केलं आहे. नेमंक काय म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अमरावतीचे नेते बघा व्हिडीओ?
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अमरावतीचे नेते त्यांच्या एका वक्तव्याने चांगलेच चर्चेत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना बंदुका वापरण्याचा परवाना द्यावा, मीच स्वतः महिलांना बंदुका वाटणार, असं वक्तव्य नानकराम नावाच्या नेत्यानं केलं आहे. यावरूनच विरोधकांनी टीकेची आयती संधी मिळाली आहे. शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी म्हणाले, ‘मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, महिलांना बंदुका वापरण्याची परवानगी द्यावी. विशेषतः अमरावतीत जर परवानगी दिली तर मी सर्व बहिणींना बंदुका घेऊन देईन. त्यांनी त्या बंदुका आत्मरक्षणासाठी ठेवावी. यामध्ये जर दोन चार चांगल्या लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस जगता कामा नये.’ असं नानकराम नेभनानी यांनी म्हटलंय. बांगलादेशातील हिंदूंवरील झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत हिंदू सकल मोर्च्यात शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी हे वक्तव्य केले आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट