‘त्या’ टीकेनंतर शिंदे गटाचा पलटवार; म्हणाले, ‘करणीवर 6 महिन्यांपूर्वीच दिला बळी’
आम्हाला रेडा बळी किती दिवस म्हणणार... शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून करण्यात आलेल्या आलेल्या टीकेवर संदीपान भुमरे यांनी जोरदार निशाणा
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हे नागपुरातील रेशमबागेतील संघ मुख्यालयात येऊन गेले. त्यामुळे सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. संघ मुख्यालयाच्या कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू पडले आहेत का? हे तपासा… महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत, त्यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे, अशा विषयांवरही सामनातून शिंदे-फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाकडून निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, सामनातील करण्यात आलेल्या टीकेनंतर शिंदे गटातील नेते संदीपान भुमरे यांनी पलटवार केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून करण्यात आलेल्या आलेल्या टीकेवर संदीपान भुमरे यांनी जोरदार निशाणा साधत प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला रेडा बळी किती दिवस म्हणणार, आम्ही 6 महिन्यांपूर्वीच त्यांचा बळी दिला असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचेही आपघात झाले यावर रेडाबळीचा संबध आहे. तर सगळे अपघात झालेले नेते काय फक्त ठाकरे गटातील आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.