संजय राऊत आता फक्त काँग्रेसमध्ये जायचेच बाकी, कोणी केला राऊतांवर हल्लाबोल
भारत जोडो यात्रेतील सहभागावरूनच शंभुराज देसाई यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा
शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत आता फक्त काँग्रेसमध्ये जायचेच बाकी राहिले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत संजय राऊत हे जम्मू येथे काल सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. राऊतांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावरूनच शंभुराज देसाई यांनी ही टीका केली आहे.
दरम्यान, संजय राऊत हे जम्मूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत काल पहाटेच सहभागी झाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली आणि त्यांचे यात्रेत स्वागत केले. भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीचा हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published on: Jan 21, 2023 07:42 AM
Latest Videos