ठाकरे गट म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, शितल म्हात्रे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
VIDEO | मुंबईच्या बांद्र्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमात शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा
मुंबई : राजकारण करणारी लोकं वेगळी, समाजकारण करणारी लोकं वेगळी असतात. आता सत्तेवर समाजकारण करणारी लोकं आहेत. राजकारण करणाऱ्या लोकांना जनतेनं घरी बसवले आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही समाजकारण करते तर रस्त्यांच्या पलिकडे राहणारे राजकारण करतात, अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर रस्त्यावर उतरून आम्ही काम करतोय, तर दुसरे घरी बसले आहेत. हाच फरक आहे बाळासाहेब यांच्या शिवसेनेत… त्यामुळे ठाकरे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याची खोचक टीकाही शितल म्हात्रे यांनी केली आहे.
Published on: Feb 12, 2023 10:31 AM
Latest Videos