शिंदे गटाची भूमिका, अजित पवार यांना भाजपनं समज द्यावी, पण का? काय आहे कारण?
VIDEO | ठाण्याच्या रूग्णालयाच्या प्रकऱणावरून शिंदे गटाचे मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज, कळव्यातील रूग्णालयातील घटनेप्रकरणी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारल्याने वाद? शिंदे गटाची भूमिका काय?
मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | ठाण्याच्या रूग्णालयाच्या प्रकऱणावरून शिंदे गटाचे मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी भाजपने समज द्यावी, अशी भूमिका शिंदे गटाची असल्याचे समजतेय.. मात्र मंत्र्यांच्या बैठकीत वाद झाला नाही तर या प्रकरणाची माहिती घेतल्याचे अजित पवार म्हणालेत. तर अजित पवार यांच्याबद्दल काही वाद नाही, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी ज्या पद्धतीने अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळव्यातील रूग्णालयातील मृत्यूबद्दल जाब विचारला त्यावरून शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांना भाजपकडून समज देण्यात यावी, अशी भूमिका शिंदे गटाची आहे. तर दादांनी भर बैठकीत थेट सवाल केल्याने मुख्यमंत्र्यांना फारसं रूचलं नसल्याची चर्चाही शिंदे गटात आहे. दरम्यान, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय झाली चर्चा…आणि या चर्चेचं वादात रूपांतर होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मध्येच दुसरा विषय काढला आणि विषय थांबला… बघा नेमकं काय घडलं.