शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात; ताफ्यातील पोलीस व्हॅनची कारला मागून धडक, किरकोळ दुखापत

| Updated on: Aug 07, 2023 | 8:11 AM

तर त्यांच्या वाहनाला त्यांच्याच पोलिस ताफ्यातील एका पोलीस व्हॅनची मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात शिंदे गटाचे आमदार किरकोळ जखमी झाले आहेत.

जळगाव, 7 ऑगस्ट 2023 | पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तर त्यांच्या वाहनाला त्यांच्याच पोलिस ताफ्यातील एका पोलीस व्हॅनची मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात शिंदे गटाचे आमदार किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी मिळालेली माहिती अशी की, आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील एक पोलीस व्हॅनने त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. ज्यात पोलीस व्हॅन आणि त्यांच्या खासगी गाडीचे नुकसान झाले आहे. तर या अपघातात आमदार पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. तर हा अपघात अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ झाला.

Published on: Aug 07, 2023 08:11 AM
Tv9 मराठी’च्या बातमीचा इम्पॅक्ट ! 12 तासात यंत्रणा कामाला, खड्डे बुजवण्यास सुरुवात!
मराठा समाजानंं पुढाकार घेऊन केली गांधीगिरी, थेट रस्त्यावर उतरून टोमॅटोची विक्री!