जितेंद्र आव्हाड यांचा ड्रग्ज तस्करांशी संबंध, भर पत्रकार परिषदेत फोटो दाखवत शिंदे गटाचा आरोप

जितेंद्र आव्हाड यांचा ड्रग्ज तस्करांशी संबंध, भर पत्रकार परिषदेत फोटो दाखवत शिंदे गटाचा आरोप

| Updated on: Oct 25, 2023 | 6:14 PM

VIDEO | ड्रग्स प्रकरणांमध्ये नाशिक पोलिसांनी मुंब्र्यातून सलमान फाळके याला अटक केली आहे. भर पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या शिवेसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सलमान फाळके यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असलेला फोटो दाखवत नेमके काय केले गंभीर आरोप?

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्स प्रकरणांमध्ये नाशिक पोलिसांनी मुंब्र्यातून सलमान फाळके याला अटक केली आहे. आज मुंबईमध्ये शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सलमान फाळके यांच्यावर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर त्यांच्यासोबत असलेले फोटो देखील मनीषा कायंदे यांनी माध्यमांसमोर आणले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, सलमान फाळके यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असलेला फोटो आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शानू पठान फोटोत दिसतोय. सुप्रिया सुळे यांच्यासोबतही सलमान फाळके याचा फोटो आहेत. हे फोटो बोलके आहेत. तुम्ही काचेच्या घरात राहत असला तरी दुसऱ्याचा घरावर दगड फेकणं हे कितपत योग्य आहे? असा सवाल करत मनीषा कायंदे यांनी टीका केली आहे.

Published on: Oct 25, 2023 06:14 PM