Sanjay Gaikwad : संजय राऊत यांना बेड्या ठोकल्या पाहिजे, शिंदे गटाच्या आमदारानं का केली आक्रमक मागणी
VIDEO | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्यातील राजकारणात चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप झालाय. संजय राऊत यांनाच बेड्या ठोकल्या पाहिजेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराकडून आक्रमक मागणी
बुलढाणा, २१ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्यातील राजकारणात चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ललित पाटील प्रकरणाचे धागे दोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत. इतकंच नाही तर संजय राऊत यांनीच ललित पाटील याला पक्षाचं कवच कुंडल दिलं, असा गंभीर आरोप करत संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. यासह संजय राऊत यांचा तपास केला गेला पाहिजे आणि संजय राऊत यांनाच बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी आक्रमक मागणीही संजय गायकवाड यांनी केली. उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटीलच्या हातावर शिवबंधन बांधलं आणि त्याला शहर प्रमुख केलं होतं. मात्र त्याआधीही त्याच्यावर अनेक गुन्हे दखल होते. सगळं माहिती असतानाही त्याला मुद्दाम पक्षात घेतलं गेलं, असेही गायकवाड यांनी म्हटले.