मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

| Updated on: Aug 12, 2023 | 5:02 PM

VIDEO | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती प्रचंड खराब असून त्यांना जबरदस्तीने अ‍ॅडमिट करणार असल्याचे मोठे वक्तव्य अन् मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरून अनेक तर्कवितर्क लढवण्यास सुरूवात

छत्रपती संभाजीनगर, १२ ऑगस्ट २०२३ | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती प्रचंड खराब असून त्यांना जबरदस्तीने अ‍ॅडमिट करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास काम करतात हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्ट नंतर त्यांना… बळजबरीने हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा. त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहितीये, असं संजय शिरसाट म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. एक दिवस त्यांची तब्येत ठिक नव्हती म्हणून ते गावी गेले आहेत. आपल्या गावात जाऊन एक दिवस आराम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ते लंडनला गेले नाहीत, असा टोलाही शिरसाट यांनी ठाकरे गटाला नाव न घेता लगावला.

Published on: Aug 12, 2023 04:43 PM