संजय राऊत यांच्या डोक्यात विचित्र..., संजय राऊत यांच्या टीकेवर शंभूराज देसाई यांचा टोला काय?

संजय राऊत यांच्या डोक्यात विचित्र…, संजय राऊत यांच्या टीकेवर शंभूराज देसाई यांचा टोला काय?

| Updated on: Jan 08, 2024 | 11:19 AM

संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केलेल्या टीकेवर शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 'संजय राऊत कधी बोललेलं खरं झालंय का? गेल्या दीड ते दोन वर्षांत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांपैकी काय खरं झालंय? हे सांगा...

मुंबई, ७ जानेवारी २४ : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलाय. आमदार अपात्रता प्रकरणावर त्यांनी राहुल नार्वेकर यांना धारेवर धरलंय. दरम्यान, यानंतर शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. राहुल नार्वेकर यांचं आजारपण हे राजकीय भूकंप आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना खोचक टोला लगावला आहे. तर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केलेल्या टीकेवर शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. ‘संजय राऊत कधी बोललेलं खरं झालंय का? गेल्या दीड ते दोन वर्षांत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांपैकी काय खरं झालंय? हे सांगा…संजय राऊत हा माणूस खोट बोलतो. त्याला काय कळत नाही. विनाकारण राजकीय भूकंप होणार असं मोठं विधान करायचं. काही भूकंप होणार नाही. सगळं सुरळीत पार पडेल’, असं थेट भाष्य शंभूराज देसाई यांनी केलं.

Published on: Jan 08, 2024 11:18 AM