मग तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात काय?, संजय शिरसाट यांची जीभ घसरली; कुणाबद्दल बोलले?
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत काहीही बोलतात आम्हाला गुलाम असं बोलता मग तुम्ही शरद पवार आणि कॉग्रेसची रखेल म्हणून काम करत आहात का? आधी मातोश्रीवर कोणताही मोठा नेता यायचा... पण या लोकांना सिल्वर ओकला जावं लागतं. मग गुलामगिरी कुणात आली? असा सवालही संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही पुढे आलोत, संजय राऊत काहीही बोलतात आम्हाला गुलाम असं बोलता मग तुम्ही शरद पवार आणि कॉग्रेसची रखेल म्हणून काम करत आहात का? असा आक्रमक सवाल करत शिंदे गटाच्या शिवेसनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना जीभ घसरली असल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, आधी मातोश्रीवर कोणताही मोठा नेता यायचा… पण या लोकांना सिल्वर ओकला जावं लागतं. मग गुलामगिरी कुणात आली? असा सवालही संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. तर संजय राऊत यांना स्वतःची मतं मांडण्याचा जो आग्रह असतो, तो ते दुसऱ्यांवर लादत असतात. मोदी असो की शाह यांचे गुणगान गाणारे, मोदींसारखा पंतप्रधान इतिहास पहिल्यांदाच भेटतोय, असं हे लोकं म्हणायचे. पण आता राऊतांनी त्यांची साथ सोडली आहे, त्यामुळे त्यांना नैराश्य आलं आहे. त्यांना कोणी विचारायला आता तयार नाही.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
