पुणे अपघात प्रकरणावर संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
'तो कितीही मोठ्या बापाचा लेक असला तरीही… हे सलमान सारखंच प्रकरण झालं, असं म्हणत शिरसाटांनी आपला रोष व्यक्त केला ते असेही म्हणाले, अनेक लोक बेधुंद होऊन गाड्या चालवतात, ते मोठ्या घरचे असेल तर काय झालं ? सामान्य लोकांचा जीवही तेवढाच महत्वाचा...'
पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणामुळे राजकीय वातावरण एकच ढवळून निघालं आहे. अशातच संजय राऊत यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मागणी केली तर संजय शिरसाट यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ते म्हणाले, माजलेल्या बापाची मुलं असतात ना, त्यांच्याकडून असे अपघात होत असतील तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. याला पक्ष नाही, याला जात नाही, याला धर्म नाही. कोणत्याही गरिबाच्या, सर्वसामान्याच्या शरीरावर गाडी चालवायची त्यात त्याचा मृत्यू होतो. अशा लोकांना कोणीही पाठिशी घालणार नाही. तो कितीही मोठ्या बापाचा लेक असला तरीही… हे सलमान सारखंच प्रकरण झालं, असं म्हणत शिरसाटांनी आपला रोष व्यक्त केला ते असेही म्हणाले, अनेक लोक बेधुंद होऊन गाड्या चालवतात, ते मोठ्या घरचे असेल तर काय झालं ? सामान्य लोकांचा जीवही तेवढाच महत्वाचा आहे. याप्रकरणी न्यायालयाने जो आदेश दिला, त्याचं पालन झालंच पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच या अपघाताची एसआयटी मार्फतही चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही शिरसाट यांनी केली.