नरेश म्हस्के यांनी कोणत्या कॅबिनेट मंत्र्याची काढली उंची, वय आणि पात्रता?

नरेश म्हस्के यांनी कोणत्या कॅबिनेट मंत्र्याची काढली उंची, वय आणि पात्रता?

| Updated on: Feb 04, 2023 | 3:05 PM

योग्यता, पात्रता नसलेल्या कॅबिनेट मंत्री झालेल्या व्यक्तीने उंची आणि वयाचे भान ठेवावे, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

ठाणे : मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज केलं आहे. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘लायकी म्हणणार नाही पण योग्यता, पात्रता नसलेल्या कॅबिनेट मंत्री झालेल्या व्यक्तीने उंची आणि वयाचे भान ठेवले पाहिजे. आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नसेल तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला वाहून घेतले आहे. ५० आमदार आणि १३ खासदारांसह लाखो शिवसैनिक त्यांच्या सोबत आहेत. तुम्हाला निवडून आणताना किती कष्ट करावे लागले हे महाराष्ट्राला माहित आहे. एकनाथ शिंदेच का पाहिजे तुमच्यासमोर वरळीतून निवडणूक लढवायला आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक विरोधात उभे करू आणि त्यांना निवडून आणू, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.

Published on: Feb 04, 2023 03:05 PM