आणि संजय राऊत यांची टेस्ट फसली, वांझोटी विचार त्यांनाच लखलाभ असो; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य

आणि संजय राऊत यांची टेस्ट फसली, वांझोटी विचार त्यांनाच लखलाभ असो; शिंदे गटातील नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Feb 14, 2023 | 2:24 PM

VIDEO | संजय राऊत हे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या खांद्यावरचे टेस्ट ट्यूब बाबू, शिंदे गटाच्या नेत्याची खोटक टीका

ठाणे : संजय राऊत हे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या खांद्यावरचे टेस्ट ट्यूब बाबू असल्याची खोचक टीका शिंदे गटातील प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. संजय राऊत यांच्या बाहेरख्यालीपणामुळे तीन वर्षा पूर्वी महविकास आघाडीचे टेस्ट ट्यूब बेबी सरकारचा स्थापन झाले. तीनही पक्षाचे विचारधारा वेगळी होती, गुणसूत्र देखील जुळत नव्हती आणि त्यांनी महाआघाडीची ट्युब बेबी तयार केली . त्यात ते हवा भरत होते कालांतराने ती ट्युब फुटली आणि अपेक्षेनुसार महाविकास आघाडी ही बरखास्त झाली. राऊतांचे टेस्ट फसली तर राऊत यांचे वांझोटी विचार त्यांनाच लखलाभ असो, अशी टीकाही त्यांनी केली. १०० कौरवंचा जन्म १०० माठात झाला असं पुराण सांगत अशा १०१ व्या माठातून संजय राऊत यांचा जन्म झाला आहे, त्यामुळे ते माठ आहेत त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

Published on: Feb 14, 2023 02:24 PM