Special Report | चुन चुन के मारेंगे! शिंदे गटाची शिवसेनेला धमकी
बुलढाण्यातल्या घटनेवरुन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनीही आमदार संजय गायकवाडांवर टीका केलीय. इकडे बुलढाण्य़ात राडा झाला असताना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही कार्यकर्त्यांना गप्प न राहण्याचा सल्ला दिलाय. अंगावर आल्यास शिंगावर घ्या असं वक्तव्य शंभुराजेंनी केलंय. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादही झाला होता.
मुंबई : बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर चाल करुन गेले. खुर्च्यांची मोडतोड झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांची कुमक मागवावी लागली. हा सगळा प्रकार झाला बुलढाणा बाजार समितीच्या सभागृहात. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. पण शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी राडा करायला सुरुवात केली. शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. यापुढे असं झाल्यास गप्प बसणार नसल्याचा इशारा संजय गायकवाड यांनी दिलाय.
आमच्या शिंदे साहेबांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. आम्हाला गद्दार म्हटलं गेलं. काल पोलीस असल्यामुळं राडा कमी झाला. इनको अभी पता नहीं हैं..शिवसेना और संजय गाय़कवाड..उनके कार्यकर्ता कितने पागल है..हे आग्यामोहळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता हैं..ये अगर खवळ जाएँगे तो बाप समजतें नहीं. इसके बाद अगर इन लोगों ने भानगड करनें का प्रयास किया..तो चुन चुन कें ये लोग मारे जाएँगे..चुन चुन कें मारें जाएँगे..गिन गिन के मारें जाएँगे अस म्हणाले. आमदार गायकवाडांचे हे आरोप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी फेटाळले आहेत. संजय गायकवाड यांच्या मुलानंच दादागिरी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
बुलढाण्यातल्या घटनेवरुन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनीही आमदार संजय गायकवाडांवर टीका केलीय. इकडे बुलढाण्य़ात राडा झाला असताना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनीही कार्यकर्त्यांना गप्प न राहण्याचा सल्ला दिलाय. अंगावर आल्यास शिंगावर घ्या असं वक्तव्य शंभुराजेंनी केलंय. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादही झाला होता.
3 ऑगस्टला शिवसेनेच्या डोंबिवलीच्या शाखेतही असाच राडा झाला होता. शिंदे आणि ठाकरे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. एकनाथ शिंदेंनी सवता सुभा मांडल्यानंतर शिवसैनिकांमध्येही उभी फूट पडलीय. काही दिवसांपूर्वी विधानसभेत भास्कर जाधव यांनी हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता.
शिवसैनिकच शिवसैनिकांना भिडू लागले आहेत. एकमेकांना आव्हान देऊ लागले आहेत,एकमेकांना चुन चुन के मारण्याची धमकी देऊ लागले आहेत. वाद कोर्टातही सुरु आहे आणि वाद रस्त्यावरही सुरु झालाय.